आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघ पांगले - पाऊस पळाला गुजरातकडे, राज्यात बुधवारी शक्यता!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/नवी दिल्ली/औरंगाबाद - मागील दोन दिवस मराठवाड्यातील बहुतेक भागात सक्रिय असलेला मान्सून आता गुजरातकडे पळाला आहे. विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडलगतचा कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्य महाराष्ट्र व गुजरातच्या दिशेने सरकला आहे. परिणामी शनिवारी मराठवाड्यात पावसाचा टिपूसही पडला नाही. येत्या चार दिवसांत मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली असली तरी, कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे गेल्याने मराठवाडा कोरडा राहिला. दरम्यान, पुणे वेधशाळेनुसार राज्यभरात बुधवारी पुन्हा पावसाची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेनुसार राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागातून परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनच्या सीमा कायम आहेत. त्याच वेळी विदर्भ व नजीकच्या भागात दोन दिवसांपासून सक्रिय असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता विरळ झाले आहे. ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकले आहे.

स्कायमेटच्या मते, विदर्भावरील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या सौराष्ट्र व लगतच्या अरबी समुद्रावर स्थिरावले आहे. त्यामुळे पावसाचा पट्टा पश्चिम भारताकडे सरकला आहे.
स्कायमेटनुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळसदृश स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होऊ शकते. उपसागरातील पूर्व-मध्य भाग, पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनाऱ्यानजीक असणारे हे क्षेत्र ४८ तासांत देशाच्या ईशान्य भागात सरकण्याची शक्यता आहे. छत्तीसगडकडे हा पट्टा सरकला तर मराठवाडा -विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या लाभ कोकण, मध्य महाराष्ट्राला सध्याचा मान्सून अरबी समुद्र किनारपट्टीलगतच्या पश्चिम भारतात सक्रिय राहील. त्यामुळे दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण राजस्थानात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मंगळवारपर्यंत तुरळक पाऊस
पुणे वेधशाळेच्या मते, १९ ते २२ सप्टेंबर याकाळात कोकणात जोरदार तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिवाय बुधवारी, २३ रोजी राज्यभर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
सरकारचे वाचले दीड हजार कोटी
राज्यात दमदार पाऊस झाल्याने चाऱ्याचा प्रश्न काही अंशी कमी झाला आहे. यामुळे गुरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी होणारा सरकारचा सुमारे दीड हजार कोटींचा खर्च वाचणार आहे. तथापि, छावण्यांचा निर्णय मागे घेतला जाणार नाही.
एकनाथ खडसे, महसूल मंत्री ("दिव्य मराठी'शी बोलताना..)
वरच्या धरणांतही पाणी वाढले : जायकवाडीच्या वरच्या बाजूला असलेले नगरचे भंडारदरा ७७, तर मुळा धरण ५५ टक्के भरले आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाचा साठा ४ टक्क्यांनी वाढून ६७ टक्के झाला आहे.
प्रकल्प - गुरुवारी - शनि.
जायकवाडी - ०५ - ५.५
येलदरी - ०३ - ०८
सिद्धेश्वर - ०० - ११
माजलगाव - ०० - ००
ऊर्ध्व पैनगंगा - २३ - ३२
मनार - ०३ - ०३
विष्णुपुरी - ११ - ५७
निम्न दुधना - २५ - ६२
सिना कोळेगाव - ०० - ००
एकूण - ०९ - १२