आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Electricity Workers Federation Hesitation In Mumbai On 25 September

मुंबई येथे बुधवारी वीज कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने 92 हजार वीज कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी बुधवारी (25 सप्टेंबर) मुंबई येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

वीज कर्मचार्‍यांना पेन्शन योजनेची अंमलबजावणी, मेडिकल योजना, बोनस, सानुग्रह अनुदान, सुधारित वेतनवाढीचा करार, वाढत्या कामाचा ताण कमी करा, रिक्त असलेल्या जागा भरा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

मराठवाड्यातील वीज कर्मचार्‍यांनी आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे संयुक्त सचिव बी. एल. वानखेडे, विभाग सचिव ए. डब्ल्यू. वायभासे, आर. एम. बोबडे, बी. बी. कोलते, पी. व्ही. पठाडे आदींनी केले आहे.