आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा लाख भावी गुरुजी उद्या देणार महाटीईटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या वतीने रविवारी (15 डिसेंबर) महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी (महाटीईटी) घेतली जाणार आहे. राज्यभरातून 6 लाख 6 हजार 215 उमेदवार 1 हजार 996 केंद्रांवर ‘टीईटी’ देणार आहेत. औरंगाबाद विभागातून 30 हजार उमेदवार 53 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
ही परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार असून उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर कॅमेर्‍यांबरोबरच बैठय़ा पथकांचीदेखील नजर राहणार आहे. परीक्षेसंबंधीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रत्येक केंद्राचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकार्‍यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर तसेच परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवाराला अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त दिलीप सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
दोन सत्र, दोन प्रश्नपत्रिका : जिल्ह्यात केवळ शहरातच परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत. एकाच वेळी 30 हजार विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यासाठी शंभरावर केंद्रांची आवश्यकता होती. त्यामुळे 53 केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. दोन सत्रांत या परीक्षा होणार असून सकाळच्या सत्रात पहिली ते पाचवीकरिता तर दुपारच्या सत्रात सहावी ते आठवीकरिता परीक्षा होईल.