आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra State Governor K Shankarnarayan Visit At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपालांसाठी भरपावसात औरंगाबादेत खड्डे बुजवण्याची मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या सोमवारच्या दौर्‍यामुळे मनपाची यंत्रणा हलली असून ज्या रस्त्यांवरून राज्यपाल जाणार आहेत त्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम भरपावसात हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ दगड-माती टाकून खड्डे बुजवले होते. ते एका पावसातच वाहून गेले.

राज्यपालांचा औरंगाबादमधील प्रवास सुखरूप व्हावा यासाठी भरपावसात व्हीआयपी रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी डांबरीकरण करून हे खड्डे बुजवले जात आहेत. शहराच्या इतर भागांतील रस्त्यांवरील खड्डे आजपर्यंत बुजवणे शक्य झालेले नाही. उलट पाऊस असल्याने डांबर बसत नाही, खड्डे बुजत नाहीत, अशी कारणे सध्याचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी दिली होती. मात्र, राज्यपालांचा दौरा येताच पावसातदेखील हे काम सुरू करण्यात आले. पावसाच्या नावाखाली खड्डय़ांत वेट मिक्स अर्थात माती व दगड भरण्यात आले. पावसात ते लगेच वाहून गेल्याने हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.