आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Public Service Commission Result Declared, Kunal Patil Came First

महाराष्‍ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, कुणाल पाटील प्रथम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या 2013-14 साठी घेण्यात आलेल्या वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’साठीच्या परीक्षांचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. 354 जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतून औरंगाबाद विभागातील 79 उमेदवारांची निवड झाली आहे. त्यात सहायक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा निबंधक, उपनिबंधक, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी इत्यादी पदांचा समावेश आहे.
डॉ. कुणाल पाटील यांनी या परीक्षेत प्रथम तर संदीप जाधव आणि निवृत्ती शिंदे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. नाशिकचे विक्रीकर निरीक्षक पाटील यांची आता सहायक विक्रीकर आयुक्तपदावर निवड झाली आहे.
मुलींमध्ये क्रांती डोंबे अव्वल : मुलींमध्ये पुण्याच्या क्रांती डोंबेने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. तिची जिल्हा उपनिबंधकपदी निवड झाली आहे. याशिवाय दिनेश पल्लेवाड, गणेश लोंढे, राहुल गोर्डे, शिवकुमार सोनवले, योगिता कोल्हे, शरदकुमार खाडिलकर, अरविंद डोंगरदिवे, अनिल चव्हाण, परशराम बागुल, किशोर चौरे, वैष्णव भारती, रोहन अहेर यांची सहायक विक्रीकर आयुक्तपदी तर इतरांची शासनाच्या इतर वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ दर्जाच्या पदासाठी निवड झाली आहे.