आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपूर्वीच्या अफरातफरीत अखेर गुन्हा नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रराज्य वक्फ महामंडळाला २०१२ मध्ये साहित्य खरेदीसाठी निधी मिळाला होता. यात सन २०१३ मध्ये ९९ लाख हजार ९१५ रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात २४ फेब्रुवारीला बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नूर मोहंमद पठाण ऊर्फ एन. डी. पठाण (रा. वर्कशॉप कॉर्नर, नांदेड), सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर सीईओंचे निलंबित स्वीय सहायक इफ्तेखारउल्ला बेग (रा. गुलशन महालजवळ, औरंगाबाद) या दोघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहेमद यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी पाच विभागीय कार्यालयांत साहित्य खरेदी करण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याक विभागाने २०१२ मध्ये कोटी ८५ लाख ९० हजार रुपये दिले. ४० कॉम्प्युटर, ४० प्रिंटर, १४ फ्रँकिंग मशीन, १५ ऑल इन वन प्रिंटर, १५ झेरॉक्स मशीन, १५ फॅक्स मशीन, १५ यूपीएस अशी ९९ लाख हजार ९१५ रुपये साहित्याची खरेदी केल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, साहित्य खरेदीत अफरातफर मंडळाची फसवणूक झालेली आहे. तसेच भांडार कक्षात कोणतेही साहित्य सापडले नाही. शासनाकडून मिळालेल्या निधीचा आवश्यकतेनुसार वापर करता जास्तीची रक्कम दाखवून पैशाचा अपहार करण्यात आला. संबंधितांविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४२४, ४२६, ४६८, ४०३, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड तपास करत असल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी सांगितले.

"अ' वर्ग अधिकारी करणार चौकशी
साहित्य घोटाळाप्रकरणी अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशानुसार सहसचिव ऐनुल अत्तार यांनी "अ' दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आणखी काही जण यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.