आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणांगण विधान परिषदेचे; जाणून घ्या कसे आहे महाराष्ट्राचे विधानमंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात विधान परिषद सदस्य पदाची निवडणूक 19 ऑगस्टला होत आहे. सर्वसाधारण आमदाराप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक नसते. विधान परिषदेत कोण कोण प्रतिनिधित्व करतात. त्यांची निवड कशी होते, या विषयीचा आढावा.

देशात सहा राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत. घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.