आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Aam Adami Party News In Marathi

महाराष्ट्र आम आदमी पार्टी ५० जागा लढण्याच्या तयारीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्र आम आदमी पार्टी मात्र या निवडणुकीत उतरणार आहे. २८८ जागांपैकी निवडक ५० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय येत्या आठ दिवसांत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब दाभाडे घेणार आहेत. आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाची दरी वाढत आहे. ग्रामीण भागात, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक सोयी-सुविधांचा अभाव आहे.

दळणवळणाची साधने नाहीत. यामध्ये बदल करण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी महाराष्ट्र आम आदमी पार्टीने ५० जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. औरंगाबाद पूर्वमधून अ‍ॅड. प्रधान व फुलंब्रीतून श्रीमंत गाडेकर इच्छूक आहेत. जालना जिल्ह्यात चार जागांसह इतर उमेदवारांची नावे लवकरच जाहीर हाेणार असल्याचे अ‍ॅड. प्रधान यांनी सांगितले.