प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमुल्य ठेवा महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील जगप्रसिद्ध 29 लेण्यांमध्ये अजिंठा लेणीची जतन करण्यात आला आहे. देशी-विदेशात पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अजिंठा लेण्यांचा शोध 1819 मध्ये एका ब्रिटिश अधिकार्याने लावला. भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी आला होता. इ.स. 28 एप्रिल,1819 रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर
आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.
प्राचीन काळापासून औरंगाबाद परिसर विविध सांस्कृतिक, नैसर्गिक बाबींनी नटलेला आहे. युनेस्कोने 1983 मध्ये अजिंठा लेणी 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केले. परिणामी औरंगाबादचे महत्त्व वाढले. त्यानंतरच्या काळात अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमुळे पर्यटनात सातत्याने वाढ होत गेली.
देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची ऐतिहासिक महत्त्वाची माहिती असलेला 'अजिंठा' मराठी चित्रपट साकार झाला आहे. पद्मश्री कवीवर्य ना.धो. महानोर यांच्या 'अजिंठा' या महाकाव्यावर आधारित आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ऐतिहासिक अजिंठा लेणीचे छायाचित्रे...