आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार जाहीर; जोशी, नणंदकर व सनपूरकरांसह जिगे ठरले मानकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदापासून महिला गटातील पुरस्कार देखील देण्यात येणार असून त्यासाठी आरतीश्यामल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. - Divya Marathi
यंदापासून महिला गटातील पुरस्कार देखील देण्यात येणार असून त्यासाठी आरतीश्यामल जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद - माध्यम जगतातील विश्व संवाद केंद्र औरंगाबाद या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2017 ची बुधवारी घोषणा करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून आद्य वार्ताहर देवर्षी नारद जयंती निमित्त पत्रकारितेची उच्च मूल्ये जोपासत, सामाजिक व राष्ट्रीय भान राखून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते. यंदा हा पुरस्कार लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, हिंगोली येथील युवा पत्रकार प्रकाश सनपूरकर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संतोष जिगे यांना दिला जाणार आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
यंदापासून महिला गटातील पुरस्कार देखील देण्यात येणार असून, हा पुरस्कार हा आरतीश्यामल जोशी यांना जाहिर करण्यात आला आहे. तर वृत्तपत्रातून सातत्याने विविध विषयांवर पत्रलेखन करुन समाज जागृती करणाऱ्या पत्रलेखकांमधून ज्येष्ठ पत्रलेखक शरद लासूरकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पत्रकारितेतील पदवी व पद्यु्त्तर पदवी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविले जाणार आहे. 
 
रविवारी पुरस्कार वितरण सोहळा
रविवार 4 जून रोजी सायंकाळी 5 वाजता यशोमंगल कार्यालयात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत अरुण करमरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन विश्व संवाद केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस अंजली कोंडेकर, संगीता धारुरकर यांची उपस्थिती होती. 
बातम्या आणखी आहेत...