आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात गुंजला "हरहर महादेव'चा गजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. "हरहर महादेव'चा गजर आणि कीर्तन शिव भजनसंध्येने वातावरण भक्तिमय झाले हाते. सातारा परिसरातही भाविकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता.

गर्दी असल्याकारणाने काही ठिकाणी दर्शन घेण्यासाठी किमान अर्धा ते एक तास वेळ लागत होता. शहारातील पुरातन मंदिरांपैकी एक खडकेश्वर मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. अनेक मंदिरांमध्ये कीर्तन व भरगच्च धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले, तर गारखेडा येथे शिवभजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. भावसिंगपुरा आणि हडकोमध्येही कीर्तनाने वेगळीच रंगत आली होती.
पारदेश्वर मंदिरात फुलांची सजावट

पळशी परिसरातील पारदेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. मंदिरात फुलांनी केलेली सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पारदेश्वराचे मंदिर अतिशय पुरातन आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला जिल्ह्यातून भाविक येथे दर्शनाला येतात.
वरूड काझी येथील जुन्नेश्वर संस्थानच्या मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. या मंदिरात महादेवाची पंचलिंगे आहेत. मंदिरात ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब कडुबा दांडगे यांनी दिली.