आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Jyotiba Fule Birth Anniversary Issue At Nashik, Divya Marathi

समतेचा संदेश देणार्‍या महात्मा जोतिबा फुलेंना शहरातील विविध संस्‍था संघटना कडून अभिवादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सामाजिक समतेचा संदेश देणार्‍या महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहर आणि परिसरातील विविध संस्था, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच शोभायात्रा काढण्यात आली.
महापालिकेत अभिवादन
महापालिकेतर्फे राजीव गांधी भवनात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपायुक्त विजय पगार, डी. टी. गोतिसे, शहर अभियंता सुनील खुने, मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे, कार्यकारी अभियंता शरद बनकर, राजकुमार खैरनार, योगेश कमोद, नितीन गंभीरे, कैलास दराडे, अशोक नाईक उपस्थित होते.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कार्यकारी अभियंता विष्णू पालवे, प्रकाश नंदनवरे, मेहेरखांब, विद्याधर कुलकर्णी, योगेश साळे, जी. पी. खैरनार, नंदू जाधव उपस्थित होते.
शहर काँग्रेस कमिटी
शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. नगरसेवक शाहू खैरे, लक्ष्मण जायभावे, उद्धव निमसे, समीना मेमन, पंडित येलमामे, प्रकाश नाईक, वत्सलाताई खैरे उपस्थित होते.
साई सेवक मित्रमंडळ
जुने नाशिक येथील साई सेवक मित्रमंडळातर्फे महात्मा फुले पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. सचिन बांडे, उमेश चव्हाण, अंकुश राऊत, चेतन राजुदे, सतीश बोढारे, अजय राजपूत, अनिल रावळ आदी उपस्थित होते.
सातपूर शहर काँग्रेस
सातपूर शहर काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस दीपक राव यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस हार अर्पण करून फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकला.