आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महावितरण करतेय दरमहा कोट्यवधी रुपयांची वरकमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात लाख ८० हजार वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून दरमहिन्याला प्रत्येकी ५० रुपये याप्रमाणे कोटी ४० लाख रुपये स्थिर आकाराच्या नावाने वसूल केले जातात. त्यानंतर वीज शुल्क १६ ते १८ टक्के, विलंब शुल्क, इंधन समायोजन आकार, व्याजाची रक्कम मिळून हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात जात आहे. याविरोधात ग्राहक आवाज उठवतात, पण त्याची दखलच घेतली जात नसल्याने हा सर्व भुर्दंड निमूटपणे त्यांना सोसावा लागत आहे. यातून महावितरणची कोट्यवधींची वरकमाई सुरू असल्याचे ग्राहक लोकप्रतिनिधी सांगत आहेत.
महावितरणने रीडिंग घेऊन वीज बिल वाटपासाठी व्हिजन, लेखा आणि अजुभाई अशा तीन एजन्सीजला नियुक्त केले आहे. सत्य रीडिंग घेऊन नियमाप्रमाणे सात दिवस अगोदर घरपोच वीज बिल मिळायला हवे, असे करारात नमूद आहे. पण एजन्सीचे कर्मचारी घरोघरी जाऊन रीडिंगची नोंद घेता अंदाजपंचे रीडिंग टाकतात. वेळेत वीज बिल देत नाहीत. अशा हजारो वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत. हे सर्व ग्राहक नियमित वीज बिल भरणा करतात. त्यामुळे तत्पर देयक भरणा सुटीच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे.

विजेच्या वापरानुसार विलंब शुल्क, व्याज, वीज शुल्क १६ ते १८ टक्के, प्रत्येकी वीज जोडणी ५० रुपये याप्रमाणे कोटी ४० लाख रुपये स्थिर आकार, इंधन समायोजन आकाराची एकत्रित रक्कम सुमारे सात कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. प्रामाणिक वीज ग्राहकांच्या खिशाला दरमहिन्याला कोट्यवधी रुपयांची झळ बसत असून महावितरणची वरकमाई सुरू आहे. ही लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

गैरव्यवहाराचा आरोप
शिवराम एकनाथ वाघ यांनी फेब्रुवारीत ११९ युनिटचा वापर केला. मार्चमध्ये तो २०९ आणि मेमध्ये ४१० युनिटवर जाऊन पोहोचला. त्यांना वीज आकार हजार ८७७.४९ रुपये, स्थिर आकार ५० रुपये, वीज शुल्क १६ टक्केप्रमाणे ५५० रुपये, इंधन समायोजन आकार ५१३ रुपये असे एकूण हजार ९९१.९० रुपये वीज बिल आकारण्यात आले. रिक्षा चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. त्यांना वेळेत वीज बिल मिळाले असते तर ३४.४१ रुपये तत्पर देयक भरणा सूट मिळाली असती. तसेच ७९.८४ रुपये विलंब शुल्कही लागले नसते. अशाच प्रकारे ग्राहकांची कोणतीही चूक नसताना त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात अाहे. उशिरा वीज बिल देऊन कोट्यवधी रुपयांचे विलंब शुल्क, चक्रवाढ व्याज वसूल केले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात येत असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार अतुल सावे, संजय शिरसाट यांच्यासह मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी केली आहे.

मनमानी अधिभार रद्द करा
कामगार वस्तीत राहणारे गाळेधारक, सेवानिवृत्त मोलमजुरी करणारे आम्ही सर्वसामान्य वीज ग्राहक आहोत. अल्प उत्पन्न मिळते. त्यात आम्हाला १५०० ते हजार ९०० रुपयापर्यंत वीज आकार येतोय. मग आम्ही नागरिकांनी कसे जगावे तुम्हीच सांगा. १६ टक्के वीज शुल्क आमच्यावर का लादले? सर्व अधिभारातून कोट्यवधी रुपयांची लूट केली जात आहे. ती तातडीने थांबवावी. विलंब शुल्क आकारात सूट देण्यात यावी. जेवढा वीज वापर तेवढच बिल मिळावे. यासाठी एन-९ सिडको, आर-२७, प्रतापगडनगरवासी आर. एन. बोराडे, एस. एच. कुलकर्णी, ताराबाई वेताळ, शंकर पवार, संजय सावळे, नंदुभाऊ खैरनार, चंद्रकांत सुरडकर, अलका रोकडे, बबनराव दाभाडे, किशोर पाठक यांच्यासह शेकडो वीज ग्राहकांनी महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर केले आहे.

पुढे काय? : मोबाइलअॅप, संगणकाद्वारे ऑनलाइन वीज बिल प्राप्त करून त्याचा भरणा करण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घेतल्यास लुटीला खऱ्या अर्थाने चाप बसेल. यासाठी ग्राहकांनी पुढाकार घ्यावा. तसेच सात दिवस अगोदरच ग्राहकांना वीज बिल मिळावे यासाठी महावितरणने नियमांचे पालन करावे.

एजन्सीवर दंडात्मक कारवाई करणार
^वीज बिलेवेळेत मिळत नाहीत, अव्वाच्या सव्वा आकारणी करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दोषी एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यानंतरही त्यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास ठेका रद्द केला जाईल. अधिभार नियमाप्रमाणेच वसूल केले जातात. अधिभारासंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी वरिष्ठांना कळवल्या जातील. -दिनेशअग्रवाल, अधीक्षक अभियंता, शहर विभाग, महावितरण.

बैठक घेणार
ग्राहकांना अवाजवी वीज बिल मिळत असल्याने ते हैराण आहेत. यावर तोडगा काढणे आणि वरकमाई थांबवण्यासाठी लवकरच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत एक बैठक घेण्याचा ठराव आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, भाऊसाहेब चिकटगावकर यांनी मांडला. त्याला जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत संमती देण्यात आली. याविरोधात विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सावे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...