आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संप न करता मिळाली पगारवाढ; वीस वर्षांत प्रथमच आंदोलनाशिवाय कृती संघटनांना यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कुठलाही संप, आंदोलन न करता महावितरणच्या कर्मचार्‍यांना यावर्षी घसघशीत 25 टक्के पगारवाढ पदरात पडली आहे. गेल्या वीस वर्षांपासून वीज कर्मचारी पगारवाढीसाठी आंदोलने, संप करतात. मात्र, यावेळी कुठलाही संप कर्मचार्‍यांनी केला नव्हता.
कर्मचार्‍यांना 25 टक्के पगारवाढ देण्यास प्रशासन तयार होते. मात्र, कृती समिती यास तयार नव्हती. कृती समिती आणि महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात बैठकीच्या दोन फेर्‍या झाल्या. गुरुवारी (26 जून) या 25 टक्के पगारवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. वर्कर्स फेडरेशनतर्फे मोहन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या सर्व संघटनांनी पगारवाढीच्या करारावर सह्या केल्या. ही पगारवाढ एप्रिल 2013 पासून लागू होणार आहे. आॅगस्ट 2014 च्या पगारात ही वाढ मिळेल.
कर्मचार्‍यांना देण्यात येत असलेले वेतन एका युनिट विजेच्या किमतीत जर काढले, तर फक्त आठ पैसे एवढी अल्प रक्कम येते, हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी पटवून दिले. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री अजित पवार यांनी 11 कामगार संघटनाचे प्रतिनिधी व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी यांच्या बैठकीत कर्मचारी संघटनांची बाजू ऐकून घेत 25 टक्के पगारवाढ देण्याचे मान्य केले.
कोट्यवधींचा महसूलदिला
कामगार संघटनांच्या कृती समितीतर्फे मोहन शर्मा यांनी पगारवाढ मागताना सन 2008 ते 2013 या पाच वर्षांत कर्मचार्‍यांनी केलेल्या कामांची यादी दिली. वीस टक्के जागा रिक्त असतानाही 1950 कोटींचा अतिरिक्त महसूल कर्मचार्‍यांनी दिला. तीन लाख 60 हजार वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणत 51 हजार 591 वीज ग्राहकांवर पोलिस केसेस दाखल केल्या. 1037 कोटींचा अतिरिक्त महसूल महावितरणला मिळवून दिला, असे त्यांनी विविध उदाहरणांसह सांगितले.
संपाची तयारी होती...
कृती संघटनेची 35 टक्के पगारवाढीची मागणी होती. दोन दिवस झालेल्या बैठकीत प्रशासन 25 टक्के पगारवाढीवर ठाम होते. त्यामुळे संघटनेने संपाची तयारी केली होती. मात्र, याचा फटका ग्राहकांना बसेल. पगारवाढीचा बोजा प्रशासनावर पडणार आहे. याचा विचार करून ही पगारवाढ कृती समितीने मान्य केली. ’’
आनंद शिर्के, सर्कल अध्यक्ष, वर्कर्स फेडरेशन, नगर.
चार हप्त्यांत मिळणार फरक
या पगारवाढीच्या फरकाचा पहिला हप्ता गणेशोत्सवात, दुसरा हप्ता दिवाळीत, तर तिसरा व चौथा हप्ता डिसेंबर 2014 मध्ये देण्यात येणार आहे.