आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahavitaran Superintendent, Latest News In Divya Marathi

‘महावितरणचे अधीक्षक सोनवणे यांना निलंबित करा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महावितरणचे अधीक्षक अभियंते आ. नि. सोनवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी (22 मे) निदर्शने केली. सोनवणे हे मनमानी कारभार करत कर्मचार्‍यांवर अन्याय करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या आंदोलनात वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, वर्कर्स फेडरेशन आदी संघटनांनी सहभाग नोंदवला.
औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांना अधीक्षक अभियंत्यांकडून सातत्याने क्षुल्लक कारणासाठी त्रास देणे, कारवाईचा बडगा उगारणे, बैठकीत सातत्याने हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्वाचा निषेध म्हणून कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण पिवळ म्हणाले, अधीक्षकाच्या वतीने कर्मचार्‍यांची पिळवणूक केली जात आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला सर्व कंटाळले आहेत. त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी दिनकर पवार, अख्तार अली, सय्यद जहिरोद्दीन यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.