आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीचा वचननामा 4 दिवसांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादलाराज्याचे पर्यटन हब बनवण्याची घोषणा असलेले शिवसेनेचे व्हिजन डॉक्‍यूमेंटसत्तेत आल्यावर निश्चित राबवण्यात येईल. तसेच हे शिवसेनेचे वचन असले तरी येत्या दोन-चार दिवसांत महायुतीचा वचननामा तयार होणार असून त्यात आणखी काही बाबींचा समावेश असणार आहे.
शनिवारी उद्धव ठाकरे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेच्या व्हिजन डॉक्‍युमेंटची माहिती सर्वंापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज एक पत्रकार परिषद बोलावून खासदार खैरे यांनी या व्हिजन डॉक्‍युमेंटची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून हे डॉक्‍यूमेंटतयार करण्यात आले आहे. त्यात रस्ते, मेट्रोसारख्या पायाभूत सुिवधा, ग्रामीण भागाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा, मार्गदर्शन पुरवणे, उद्योगांना चालना मिळावी यासाठी खास करून लघु मध्यम उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन धोरण आखणे, लघुउद्योग उभारणीसाठी बीजभांडवल व्हेंचर कॅपिटल उभारणीसाठी अर्थसंकल्पातच तरतूद या बाबींचा समावेश आहे.
सिचन क्षमता वाढवणार
कृषीक्षेत्राच्या विकासासाठी विशेष अर्थसंकल्प, ऊस कापसासाठी विशेष धोरण, आणेवारी कायदा बदलून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारावर भरपाई देण्यात येणार आहे. शिवाय सिंचन क्षमताही वाढवण्यात येणार असल्याचे डॉक्युमेंटमध्ये म्हटले आहे. याशिवाय ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, पोलिस यंत्रणेतील सुधारणा युवा धोरण यांचाही उल्लेख त्यात करण्यात आला आहे. औरंगाबादला पर्यटन, सिंधुदुर्गला सागरी, कोल्हापूरला कृषी तर नागपूरला ट्रान्सपोर्ट हब केले जाईल.

या पत्रकार परिषदेला आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, शहरप्रमुख राजू वैद्य, संतोष जेजूरकर, लता दलाल, उद्योजक राम भोगले, उमेश दाशरथी यांचीही उपस्थिती होती.