आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसलेल्या पाण्याने पळवले उमेदवारांच्या तोंडचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणूक लढताना राजकीय पक्ष कोणत्या विषयांना हात घालतील आणि कोणते विषय पांगवतील याचा नेम नसतो. त्यामुळे सातारा आणि देवळाईत निवडणुका जाहीर होताच ‘दिव्य मराठी’ने या दोन वाॅर्डांतील खरे विषय कोणते जनतेचा अजेंडा काय याचा धांडोळा घेतला. पाणी, पाणी, पाणी.... या एकाच विषयाला नागरिकांनी प्राधान्य दिले. नेमके याच विषयाने शर्यतीत असलेल्या तिन्ही पक्षांची जाम अडचण झाली आहे. मागच्या तीन-चार दिवसांत शिवसेना असो की भाजप की काँग्रेस, कोणत्याही पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते मत मागायला गेले की लोक विचारतात की पाण्याचे काय करता सांगा? नेमकी अडचण याच प्रश्नावर होते.
अनेक वर्षांपासून समस्यांचा सामना करावा लागत असल्याने संतापलेल्या आलोकनगर, वृंदावन विहार आणि श्रीरामनगर, विश्वकर्मा हाउसिंग सोसायटीतील नागरिकांनी मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे हमीपत्र मागत निरुत्तर केल्याचा प्रकार पाणीप्रश्न किती गंभीर आहे, हे सिद्ध करतो. फक्त पाणीच नव्हे तर रस्ते, मलनिस्सारणवाहिनी या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या समस्या सोडवू, असे लेखी द्या नाहीतर मत मागू नका, अशी रोखठोक भूमिका घेणाऱ्या नागरिकांचे समाधान करण्याचे आव्हान सर्वच पक्षांच्या उमेदवारांसमोर आहे . शिवसेना आणि भाजप शहरात सत्तेत एकत्र आहेत; पण या वाॅर्डात आमनेसामने आहेत. समांतरच्या विषयावरून शिवसेनेची प्रचंड कांेडी झालेली आहे. योजना धड चालत नाही, नागरिक ओरड करीत असतात, सेनेला मात्र त्याचे समर्थन करावे लागते. दुसरीकडे भाजपला सेनेची कोंडी करण्यासाठी हा विषय म्हणजे हुकमी एक्का असल्याने ते समांतरवरून सेनेला अडचणीत आणतात. त्यामुळे सातारा देवळाईत पाण्यासाठी समांतर आणू असे धाडसी विधान शिवसेना करू शकत नाही. केले तरी शहराचा अनुभव जगजाहीर असल्याने सातारकर जनता त्यावर तोळाभरही विश्वास ठेवायला तयार नाही. तिकडे शिवसेनेच्या या गेाचीमुळे आनंदी झालेल्या भाजपला जेव्हा तुम्ही काय करणार असे विचारले जाते, तेव्हा त्यांच्याकडेही ठोस असे कोणतेही उत्तर नाही. समांतर नाही तर काय करणार याचे उत्तरच भाजपच्या नेत्यांकडे नाही. काँग्रेसची तर आणखीच बिकट अवस्था आहे, आपण सातारावासीयांना पाणी आणून देऊ याशिवाय ते काहीच सांगू शकत नाहीत. हे दोन्ही वाॅर्ड पााण्याच्या बाबतीत एवढे संवेदनशील आहेत की इतर बाबींचा प्रचार ऐकून घेण्यात त्यांना काडीचाही रस नाही. त्यामुळे पहिल्या प्रश्नालाच नागरिक राजकीय पक्षंाची अडचण करीत आहेत.

कोट्यवधींची उलाढाल असल्याने सगळे समांतर टँकरच्या बाता मारतात. पण लोकांना विश्वास बसेल अशा योजना कुणाकडे तयार नाहीत. डोंगर उशाशी असताना जवळपास तलावांची संख्या पुरेशी असताना त्यांचा वापर करून साताऱ्यासाठी पाणी योजना करता येऊ शकते. शिवाय गांधेलीच्या तलावाचाही वापर करता येऊ शकतो. पण अशा कायमस्वरूपी तोडगा निघ्ू शकणाऱ्या समांतरच्या घशात आणखी पैसे टाकता पाणी देऊ शकणाऱ्या योजनांबाबत कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. पण आज ना उद्या सत्ताधारी विरोधकांना यावर विचामंथन करावेच लागणार आहे. अन्यथा महापालिकेत येऊन गाीतून फुपाट्यात आल्याची जाणीव जोर धरेल बालेकिल्ले कधी भुईसपाट होतील हे कळणार नाही. आज प्रचारात कार्यकर्ते नेत्यांना पाण्याच्या प्रश्नावर निरुत्तर व्हावे लागत आहे. पण हाच प्रश्न त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा ठरणार आहे.