आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थान गणपतीपासून मुख्य मिरवणूक,अनेक मंडळे होणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १५ तारखेला सकाळी ११ वाजता संस्थान गणपतीपासून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होईल. ती राजाबाजारहून शहागंज, गांधी पुतळा, सराफा बाजार, सिटी चौक, मछली खडक, गुलमंडी, बारा भाई ताजिया चौक, औरंगपुरा पोलिस चौकी, महात्मा फुले चौक येथून जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहिरीकडे जाईल. याच मिरवणुकीला भडकल गेटकडून येणारी गणेश मंडळे सहभागी होती. तिकडे मिल काॅर्नरकडून काही गणेश मंडळांची मिरवणूक महात्मा फुले चौकात मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील. मात्र, अशा मंडळांची संख्या कमी आहे.

सिडकोतील मिरवणूक : सिडकोएन-५ पासून सुरू होणारी मिरवणूक एन-६, बजरंग चौक, एन-७, बळीराम पाटील चौकामार्गे एन-९, टीव्ही सेंटर, एन-१२ मार्गे साक्षी मंगल कार्यालय जवळील विहिरीत विसर्जन होईल.

पार्किंग: एन-५ चे मैदान, गरवारे स्टेडियमचे मैदान, हडकोतील फरशी मैदान, मजनू हिल गार्डन.

मुकुंदवाडीतील मिरवणूक : मुकुंदवाडी बसस्थानकावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघेल. रामनगर, विठ्ठलनगर, चिकलठाणा येथून संघर्षनगरातील मंडळांच्या विहिरीकडे जाईल.
पार्किंग: शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ, मुकुंदवाडी बसस्थानकाचा परिसर.

नवीन औरंगाबाद: गजानन महाराज मंदिर येथून निघेल. शिवाजीनगरात विसर्जन होईल.

मुख्य मिरवणूक : येथे करा पार्किंग मुख्य मिरवणूक पाहायला येणाऱ्यांना पैठण गेट परिसरापर्यंतच वाहने नेता येऊ शकतात. समर्थनगरातून येणाऱ्यांना निराला बाजारात वाहने लावता येतील तर नारळीबागेचे मैदान, शहागंजात हिंदी विद्यालयाच्या परिसरात वाहने लावता येतील. मोंढ्यातून येणाऱ्यांना अंगुरीबागेतून जात गुलमंडीच्या मागच्या भागात दुचाक्या लावता येतील.
बातम्या आणखी आहेत...