आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाल ब्रह्मांडातील चमचमत्या तार्‍यांचा तेजोगोल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल ब्रह्मांडातला तेजोगोल अगणित तार्‍यांनी उजळून निघतो. त्यांच्या भ्रमणाचे एक विस्मयकारी दृश्य आमचे छायाचित्रकार माजिदखान यांनीस्टार्टट्रेल फोटोग्राफी तंत्राने टिपले आहे. खगोल अभ्यासक व्यंकटेश केदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे आपणास तारे पूर्वेस उगवताना दिसतात पृथ्वीच्या उत्तर ध्रुवासमोर ध्रुवतारा आहे. तो स्थिर नसतो. त्याचीही जागा बदलत असते. सध्या थुबान नावाचा तारा ध्रुवतारा आहे. यापूर्वी पोलरिस नावाचा ध्रुवतारा होता. आणखी १३ हजार वर्षांनी नवा तारा त्याच जागेवर अस्तित्वात येईल. त्याचे आतापासूनच अभिजित असे नामकरण करण्यात आले आहे. थुबानच्या भोवतालच्या भागातील तार्‍यांना ध्रुवमत्स्य असे म्हणतात. हे तारे त्या ध्रुवतार्‍याच्या भोवती चक्राकार फिरताना दिसतात. त्यांची गती थुबानपासून असलेल्या अंतराच्या प्रमाणानुसार वेगवेगळी असते. हा देखावा उत्तर ध्रुवावरून अधिक स्पष्ट पाहण्यास मिळतो.

कसे टिपले छायाचित्र?
माजिद खान यांनी २९ एप्रिल रोजी औरंगाबादपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सारोळा जंगलात रात्री ११ वाजता प्रवेश केला. हाय पॉवर क्वालिटी ट्रायपॉड स्टँडवर कॅमेरा ठेवून ११.४५ वाजता फोटो क्लिक करणे सुरू झाले. ते पहाटे चार वाजता पूर्ण झाले. रिमोट कंट्रोलच्या मदतीने त्यांनी १८० फ्रेम्स टिपल्या. स्टार्टट्रेल सॉफ्टवेअरचा वापर करून हे छायाचित्र पूर्णत्वास नेले.