आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादच्या हाॅकीला अांतरराष्ट्रीय चमक; 1966 मध्ये हाॅकीचे जादूगार ध्यानचंद आले होते शहरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद -दिवंगत अण्णा बनसाेडे यांच्या रूपाने औरंगाबादने देशाला अांतरराष्ट्रीय हाॅकीपटू दिला. यातूनच अांतरराष्ट्रीयस्तरावर अाैरंगाबादच्या हाॅकीला वेगळीच चमक मिळाली आणि अाैरंगाबादचे नाव चर्चेत राहू लागले. त्यामुळे अटकेपार झेंडे फडकावणाऱ्या अाैरंगाबादच्या खेळाडूंमधील प्रतिभा पाहण्यासाठी खुद्द हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी १९६६ मध्ये अाैरंगाबादला भेट दिली.  
 
त्यानंतरही ते दोन वेळा मुद्दाहून औरंगाबादला आल्याची नोंद आहे. पोलिस अायुक्तालयाच्या विक्रम स्टेडियमवर अखिल भारतीय विद्यापीठ हाॅकी स्पर्धेचे झाल्या होत्या. मेजर ध्यानचंद यांनी या स्पर्धेचे प्रमुख अतिथीपद भूषवले. तत्कालीन दशकात हाॅकीत लक्षवेधी खेळी करणाऱ्या अाैरंगाबादच्या अनेक नामांकित खेळाडूंची त्यांनी भेट घेतली.
 
प्रतिभावंतांचे केले खास काैतुक
स्वातंत्र्यापूर्वीपासूनहाॅकीचा वारसा जपण्याचे काम छावणी क्लबच्या माध्यमातून झाले. त्यामुळे अाैरंगाबादेतील हाॅकी राष्ट्रीय पातळीवर नावारूपास अाली. याच प्रतिभेने मेजर ध्यानचंद यांचे लक्ष वेधले. यामुळे अाैरंगाबादमध्ये अालेल्या मेजर ध्यानचंद यांनी त्या सर्व खेळाडूंची भेट घेतली अाणि सर्वांचे खास काैतुकही केले. यामध्ये स्व. व्ही. लक्ष्मीनारायण अाणि जी. लक्ष्मीनारायणसारख्या हाॅकीपटूंचा समावेश अाहे. 

दाेन दशके छावणी क्लबने गाजवल्या राष्ट्रीय स्पर्धा : अाैरंगाबादेतीलछावणी क्लबने (कँटाेनमेंट हाॅकी क्लब) १९५० ते १९७५ दरम्यानचा काळ चांगलाच गाजवला. राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धांत या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली. दि. एम.ए. रमण्णा यांच्या नेतृत्वाखाली या टीमने हैदराबादसह पंजाबसारख्या ठिकाणीही अापला दबदबा निर्माण केला होता.
 
कुवेत, दुबईत ‘समशेर’
अाैरंगाबादचे अाघाडीचे हाॅकीपटू म्हणून समशेर शेख यांची अाेळख अाहे. त्यांनी वर्षे कुवेत अाणि वर्षे दुबईतील क्लबकडून हाॅकी खेळली. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांसह हैदराबाद दक्षिण रेल्वेचे प्रतिनिधित्व केले.
 
बाबूभाईंचा दबदबा
प्रतिष्ठेच्या अागाखान चषक हाॅकी स्पर्धेत छावणी क्लबचे जी. लक्ष्मीनारायण (बाबूभाई) यांनी दबदबा निर्माण केला. त्यांनी ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक राष्ट्रीय अाणि क्लबच्या स्पर्धा गाजवल्या. 
 
अजिंठा चषकाला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा
स्व.व्ही. अार. लक्ष्मीनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली ७० च्या दशकात अाैरंगाबादेत ‘अखिल भारतीय अजिंठा चषक इव्हिटेन्शनल हाॅकी स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यांनी १९७४ मध्ये अाैरंगाबाद जिल्हा हाॅकी संघटनेची स्थापना केली. अल्पावधीत या स्पर्धेला राष्ट्रीयस्तरावर प्रतिष्ठा लाभली. यातूनच पंजाब, हरियाणा पाेलिस टीम, इतर नावाजलेल्या क्लबनेही या स्पर्धेत सहभाग नाेंदवला. २००४ पर्यंत ही स्पर्धेचे होत होत्या. त्यानंतर ही स्पर्धाच बंद झाली. 
बातम्या आणखी आहेत...