आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: औरंगाबादमधील रिलायन्स मॉलच्या आवारात भीषण आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलच्या मागच्या बाजूला आज (रविवार) दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या ठिकाणी गोडाऊनमधील काही माल ठेवला असल्याने आगीने लगेच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आगीचे स्वरुप मोठे असल्याने त्यांना यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, रिलायन्स मॉलच्या आवारात लागलेल्या आगीचे फोटो....