आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Political Parties Give Braman Community Candidates For Assembly Election

ब्राह्मण महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद, प्रमुख पक्षांनी दिले उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतला आहे. भाजपने या समाजाचे २० उमेदवार उभे केले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने १०, मनसे ८, तर काँग्रेसने ५ उमेदवारांना संधी दिली आहे. राज्यातील ब्राह्मण समाजाची लोकसंख्या सुमारे १ कोटी १० लाख असून त्यापैकी ६० लाख मतदार आहेत, असा दावा महासंघातर्फे करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ब्राह्मण महासंघाने उघडपणे राजकीय भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील २८८ पैकी ५७ मतदारसंघांत विजयी उमेदवार ठरवण्याची, तर २० जागांवर उमेदवार पाडण्याची ताकद या समाजात असल्याचा दावा महासंघाने एका सर्वेक्षणाच्या आधारावर या मेळाव्यात केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी महासंघाने उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना, तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार, उदय सामंत, जयदत्त क्षीरसागर, राजेश वठारकर या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, निवडून आल्यावर या नेत्यांनी ब्राह्मण समाजासाठी काहीच केले नसल्यामुळे महासंघ त्यांच्यावर नाराज असल्याचे महासंघाचे औरंगाबाद शहर अध्यक्ष डॉ. संतोष सवई यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांनी ब्राह्मण समाजाला हिणवण्याचे वक्तव्य करून आमच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे.

राष्ट्रवादीवर नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका सभेत ब्राह्मण समाजाविषयी अनुद्गार काढल्याचा आरोप करत महासंघाने या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ब्राह्मण मतदारांना सदैव गृहीत धरणा-या सर्वच राजकीय पक्षांना या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही महासंघाने दिला आहे.