आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankrant Wan Blanket Distribution Poor People At Aurangabad

मकर संक्रांतीच्या वाणाच्या रकमेतून अनाथांना ब्लँकेट्स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: मकर संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचा उत्सव सध्या सर्वत्र सुरू आहे. रथसप्तमीपर्यंत घरोघरी चालणार्‍या या सोहळ्यात महिला वाण देतात. वर्षानुवष्रे चालणार्‍या या परंपरेला फाटा देत शहरातील आस्था जनविकास संस्थेच्या महिलांनी गरजू, अनाथ बालकांना वाणांच्या जमलेल्या रकमेतून ब्लँकेट्सचे वाटप करून अनोखा पायंडा घातला.
हळदी-कुंकवाच्या माध्यमातून महिला एकमेकींना भेटतात. विचारांचे आदान-प्रदान होते. वाणाची वस्तू ऐपतीनुसार देण्यात येते. संवादाचा हाच धागा कायम ठेवत ज्योतीनगर येथील आस्था जनविकास संस्थेच्या वतीने वाणांच्या वस्तू लुटण्याऐवजी या रकमेचे संकलन करून वाढत्या थंडीचा वेध घेत उस्मानपुरा येथील गजानन बालसदन येथे ब्लँकेट्सचे वाटप केले. या वेळी मुलांना अल्पोपाहारही देण्यात आला. एकमेकींना वाण देण्यापेक्षा वाणासाठी खर्च होणार्‍या रकमेचा उपयोग कडाक्याच्या थंडीत बालकांचे संरक्षण करण्यासाठी व्हावा असा एकमेव उद्देश आहे.
ब्लँकेट्स वाटप कार्यक्रमाप्रसंगी बालसदनच्या अध्यक्षा कमल शिंदे, अधीक्षक जयराज नारायणकर यांची उपस्थिती होती. यासाठी संस्थेच्या वतीने आश्विनी जहागीरदार, जया कृष्णमूर्ती, प्राजक्ता मुर्कीकर, आशा तेली, गीता खांबेकर, रार्जशी खांबेकर, पुष्पा ढाकणे, नीता महाजन, अदिती आठवले, संगीता क्षत्रिय, रंजना तुळशी, रेखा क्षीरसागर आणि गौरी वैष्णव यांची उपस्थिती होती.