आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Women Rush In Paithan Nath Temple

नाथांना तिळगूळ देण्यासाठी महिलांची गर्दी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - मकर संक्रांतीनिमित्त पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिरात नाथांच्या चरणी वाण ठेवण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. नाथ मंदिरात सकाळपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या. औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर, परभणी या ठिकाणाहून मोठ्या संख्येने महिला नाथांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. नाथांच्या चरणी तिळगूळ ठेवल्यानंतरच महिलांनी एकमेकींना वाण दिले. मकर संक्रांतीला महिला गोदावरीत स्नान करून गोदावरीला वाण अर्पण केल्यानंतर नाथांच्या पत्नी गिरजाबार्इंना उखाण्यातून पती नाथांचे नाव घ्यायला लावायच्या. महिलांचा उत्साह पाहून नाथ महाराजही उखाण्यात गिरजेचे कौतुक करायचे. त्यानंतर महिला आनंदित होऊन नाथवाड्यात फुगड्या खेळायच्या. फुगड्या खेळता खेळता ओव्यातून नाथांचे कौतुक करायच्या.