आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Acquisition Kailas Nager To MGM, Order Of The Officers Kendrekara

कैलासनगर ते एमजीएम रस्त्यासाठी भूसंपादन करा, मनपा आयुक्त केंद्रेकर यांचे अधिकाऱ्यांना आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालनारोडवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी लक्ष्मण चावडी ते कैलासनगर एमजीएम या समांतर रस्त्याचे काम मालमत्तांचे भूसंपादन करून मार्गी लावावे, असे स्पष्ट आदेश मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी दिले. विकास आराखड्यात बदल करून मालमत्ता वाचवण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने भूसंपादनाकडेच लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

१९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात हा रस्ता नमूद केला होता. मात्र, तत्कालीन नगर परिषद आणि नंतर महापालिकेने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. स्मशान मारुती मंदिरापासून सुमारे २५० मीटर अंतरावर असलेल्या वळणावर काही घरे उभी राहिली. त्यावरही २०११ मधील रुंदीकरण मोहिमेत कारवाई झाली नाही. त्यामुळे जालना रोडवरील ताण वाढत गेला. हा मुद्दा दिव्य मराठीने "सहकारातून समस्यामुक्ती' अभियानाअंतर्गत लावून धरत समांतर रस्त्याला गती देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. तेव्हा शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी स्मशान मारुतीपासून एमजीएमकडे वळणाऱ्या रस्त्यावर १६ मालमत्ता वाचवण्यासाठी नाल्यावर ११ कोटींचा पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला हे.

आयुक्तही आग्रही
दरम्यान,पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावले पाहिजे, असे ठणकावून सांगितले. गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेतही या रस्त्याचा विषय मांडला गेला. त्यावर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज शुक्रवारी सिडको कार्यालयात रस्त्यांच्या विषयावर नगरसेवकांची एक बैठक बाेलावली होती. त्यात आज पुन्हा हा विषय निघाला. तेव्हा विकास आराखड्यात अंशत: बदल करून नाल्यावर पूल बांधण्यापेक्षा मालमत्तांचे संपादन करणे कायदेशीर असल्याचे चर्चेअंती ठरले. सध्या मनपाच्या तिजोरीत भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी रक्कम उपलब्ध नाही.