आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Awareness For Less Area Voting In Aurangabad City

५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानाच्या वसाहतीत जनजागृती करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभेत ज्या मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, तेथील वसाहतींमध्ये मतदानासाठी जनजागृती करा, अशी सूचना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी िनवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांना केली.

जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची जय्यत तयारी म्हणून विक्रमकुमार यांनी सर्व निर्वाचन अधिकारी व सहायक निर्वाचन अधिकारी यांची सभागृहात बैठक घेऊन तपशीलवार मार्गदर्शन केले. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची उपस्थिती होती. विक्रमकुमार यांनी सर्व निर्वाचन अधिकारी यांचे कार्यालय येत्या गुरुवारपर्यंत आवश्यक त्या कर्मचारी वर्ग व साहित्यासह
स्थापित करण्याच्या सूचना दिल्या.
आचारसंहिता लागू झाली असल्याने आतापासून व्हिडिओग्राफी पथके तैनात केली जावीत, प्रत्येक विधानसभेला सध्या ४ पथके ठेवावीत, आचारसंहितेचे उल्लंघन व मतदारांना रकमेचे वाटप लक्षात घेऊन भरारी पथके नेमावीत, उमेदवारांचे अर्ज स्वत: निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्वीकारावेत, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो रजिस्टर ठेवावे, प्रमुख उमेदवारांच्या हालचाली टिपण्यासाठी सकाळी ६ ते रात्री घरी जाईपर्यंत व्हिडिओग्राफी करावी, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.

उमेदवारांनी मागितलेल्या प्रचारसभेच्या स्थळाची परवानगी, लाऊडस्पीकर परवानगी, छपाई परवानगी, प्रसिद्धीसाठी अनुमती इत्यादी निवडणूकविषयक बाबी वेळेत पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट पेपर्स पुरवण्यात यावेत. नवीन मतदारांची नोंदणी तहसील कार्यालयातील मदत केंद्रात १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येईल.