औरंगाबाद – सतत तीन वर्षांपासून होरपळत असलेल्या मराठवाड्यामध्ये यंदाही पावसाने दीर्घ उघडीप दिली. परिणामी, खरीप हंगाम धोक्यात आला. दरम्यान, या एका महिन्यात 40 टक्के पीक शेतक-यांच्या हातून गेले. त्यानंतर आता कुठे शासनाने कृत्रीम पाऊस पाडण्याची तयारी केली असून, त्या संबंधी अमेरिकेतील एका संस्थेला कंत्राटही दिला आहे. मदत व पुनर्वसनच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी औरंगाबादेत डॉपलर रडार लावण्यासाठी जागेची पाहणी केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कृत्रीम पावसासाठी यंत्रणा सज्ज होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली
पाऊस परतल्यानंतर कृत्रीम पाऊस
मराठवाड्यातील काही भागांत दोन दिवसांपासून काही पाऊस परतला आहे. त्यामुळे पिकांना काही प्रमाणात संजवनी मिळाली आहे. असे असताना शासनाकडून आता कुठे कृत्रीम पाऊस पाडण्याची तयारी केली जात आहे. हाच कृत्रीम पाऊस 15 दिवसांपूर्वी पाडला असता तर शेतक-यांचे नुकसान टळले असते.
कसा पडतो कृत्रीम पाऊस हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा