आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बोकडही आले online; व्यापार्‍यांनी लढवली नवी शक्कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कुर्बानीचे प्रतिक असलेला सण ईद-उल-जुहा म्हणजेच बकरी ईदला येण्यास अजून 15 दिवस बाकी आहे, पण कुर्बानी देण्यासाठी बकर्‍यांच्या खरेदी विक्रीला सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. ऐरवी पारंपरिक पध्दतीने गर्दीच्या ठिकाणी अथवा बोकड बाजारातून बोकडांची विक्री होत होती, मात्र आता मोबाईल, कपडे आणि इतर वस्तूंप्रमाणे बोकड्यांचे व्यापारी हे ऑनलाईन बाजारामध्ये प्रवेश करत आहेत.
OLX सारख्या ऑनलाईन वेबसाईटवर अनेक बोकड व्यापार्‍यांच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. पुण्याच्या काही बोकड व्यापार्‍यांनी त्यांच्या बकरी ईद स्पेशल बोकडांचे फोटो येथे टाकले आहेत. यामधील पुण्याच्या मछिंद्र ढाकणे यांनी त्यांच्या बोकडाची जाहिरात दिली आहे. या बोकडाच्या डोक्यावर चंद्र आहे असे त्यांनी या जाहिरातीत सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या या बोकडाची किंमत त्यांनी 2 लाख 51 हजार एवढी ठेवली आहे. तसेच पुण्याच्याच नारायण पवार या व्यापार्‍यांने त्यांच्या बोकडाच्या फोटो सोबत त्याच्या डोक्यावर ईदचा चंद्र असल्याचे सांगितले आहे. या बोकडाची किंमत त्यांनी 1 लाख 51 हजार एवढी सांगितली आहे.
पुण्याच्याच विजय पाटील या व्यापार्‍याने त्यांच्या बोएर सिरोही या बोकडाची किंमत दोन लाख रुपये एवढी सांगितली आहे. विजय यांच्या बोकडाच्याही डोक्यावर ईदचा चंद्र असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशाच प्रकारे इतरही बोकड व्यापार्‍यांनी आपापल्या बोकडांच्या जाहिराती येथे दिल्या असून त्यांच्या किंमती 5 हजार ते 50 हजार दरम्यान ठेवल्या आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, बोकडांच्या ओएलएक्सवरील काही जाहिराती...