आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानवडोद : विहिरीत मृतदेह आढळला, पानवडोद येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळेगाव - सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील माणिकराव कोंडिबा सुरडकर (वय ५५) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. गवालागत गट क्र. ५५ मध्ये सय्यद दौलत यांच्या विहिरीत लोखंडे यांनी मृतदेह पहिला. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे बीट जमादार ए. एफ. आव्हाड, बोदवडे, जाधव यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला. पानवडोद येथील प्रा. आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मनोहर वानखडे यांच्या मर्गदर्शनाखाली पोलिस करत आहेे.
बातम्या आणखी आहेत...