आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधामोहन कॉलनीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राधामोहन कॉलनी येथील नरेंद्र राधाकृष्ण कुलकर्णी (४८) यांनी राहत्या घरात खिडकीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कोचिंग क्लासेसचा व्यवसाय होता. ज्या वेळी त्यांनी आत्महत्या केली त्या वेळी घरामध्ये त्यांचा मुलगा होता. तो रात्रपाळी करून आल्याने झोपला होता. कुलकर्णी यांची पत्नी मनपा शाळेत नोकरीला असल्याने त्या शाळेत गेल्या होत्या. घटनेची माहिती कळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुलकर्णींना घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषत केले.