आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची मानसी थेट मिसेस इंडिया आर्चज स्पर्धेत, बोलक्या डोळ्यांची पुणेकरांना भुरळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादच्या मानसी करजगावकर हिने दिवा मिसेस पुणे स्पर्धेत सहविजेत्याचा किताब पटकावत मिसेस इंडिया आर्चज स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे. सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंट म्हणून सेलिब्रिटीजना इमेज बिल्डिंगचे समुपदेशन देणाऱ्या मानसीच्या बोलक्या डोळ्यांनी पुणेकरांना भुरळ पाडली. ती आयकॉनिक आइज अॅवार्डची मानकरी ठरली आहे. देश-विदेशात रिसर्च पेपर प्रकाशित झालेेली मानसी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मानसशास्त्रात पीएचडी करत आहे.
 
मानसी करजगावकर ही योगतज्ज्ञ आणि फिजिशियन डॉ. गिरीधर करजगावकर यांची कन्या. सातवीपर्यंत महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने १० वी विशाखापट्टणमच्या गुरुकुलमधून पूर्ण केले. देवगिरी महाविद्यालयातून काॅमर्समधून बारावी केले. तर पुणे विद्यापीठातून बीबीए फायनान्स केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ती मानसशास्त्रात एमए आणि आता याच विषयात पीएचडी करत आहे. मानसशास्त्रातील तिचे अनेक रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
 
मिस इंडियासाठी पात्र
मानसीलालहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. शाळा, कॉलेजमध्ये तिने ती जोपासली. विवाहानंतर पुण्यात गेल्यावर ही आवड पुढे नेली. यामुळेच गेल्या आठवड्यात झालेल्या दिवा मिसेस पुणे या स्पर्धेत २० ते ३२ या वयोगटात ती फर्स्ट रनर अप ठरली. या स्पर्धेत बेस्ट आयकॉनिक आयचा किताबही तिने पटकावला. या स्पर्धेत यशस्वी झाल्यामुळे नियमाप्रमाणे तिची पुढील वर्षीच्या दिवा मिसेस पुणे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. मार्चमध्ये आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत तिला वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. मिसेस इंडियासाठीच्या पात्रता फेऱ्या देताच ती या स्पर्धेत सहभागी होईल, तर मिसेस पुणेतील यशामुळे ती वर्षभर राज्यभर महिला सबलीकरणावर मार्गदर्शन करेल.  

लेखिका आहे मानसी करजगावकर 
मानसी‘चेंज मेकर्स’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत समाजोपयोगी काम करते. विवाह समारंभात उरलेले अन्न गरजूंना वितरित करण्यासाठी ती पुढाकार घेते. गेल्या पावसाळ्यात तिने विविध जातीची १००० झाडे लावली जगवली. ती सध्या इंग्रजीतील फिक्शन कादंबरी लिहीत आहे.
 
औरंगाबादकर असल्याचा मला अभिमान वाटतो 
बालपणऔरंगाबादेतगेले. या शहरात पारंपरिक संस्कृती आणि आधुनिकता सोबत नांंदते. येथे व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास होतो. दिवा मिसेस पुणे स्पर्धेसाठी याचा फायदा झाला. म्हणूनच औरंगाबादकर असल्याचा अभिमान वाटतो. -मानसी करजगावकर, सहविजेती, दिवा
 
पुढील स्लाइडवार पाहा मानसीचा दिवा स्पर्धेतील विजेता फोटो...
बातम्या आणखी आहेत...