आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikrao Thackre News In Marathi, Congress, Divya Marathi, Modi, RSS

मोदींच्या नावाने राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्ता काबीज करायची आहे - माणिकराव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ इच्छितात, असे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मोदींच्या नावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्ता काबीज करायची आहे. हे वेळीच ओळखून धर्मांध शक्तींना रोखावे, असे आवाहन माणिकराव ठाकरे यांनी केले. सर्व जाती-समुदायांना फक्त काँग्रेसच सोबत घेऊन चालतो आहे. विचारांची लढाई फक्त काँग्रेसच लढू शकतो, त्यामुळे या वेळी काँग्रेसला पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तीन तास उशिराने आले. ते फार फार तर साडेतीनपर्यंत येतील या अंदाजामुळे उमेदवार नितीन पाटील स्वत: तीन तास ताटकळले. सव्वासहा वाजता सुरू झालेली ही बैठक अवघ्या 40 मिनिटांत जिकडे-तिकडे झाली. मात्र, त्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा करावी लागल्याने बैठक सुरू होण्याआधी अनेक काँग्रेस जणांनी घरचा रस्ता धरल्यामुळे या सभागृहातील अनेक खुच्र्या नंतर रिकाम्या दिसल्या.


काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. मात्र, ठाकरे येणार हे नक्की होते. शिवाय ते वेळेत येऊन पुन्हा लगेच परतणार असल्याचे सांगण्यात आल्याने नितीन पाटील बरोबर तीन वाजेपासून जालना रोडवरील या लॉन्समध्ये येऊन थांबले होते. अवघ्या पाच मिनिटांत नेते येताहेत, अशी घोषणा करणारा सूत्रसंचालकही थकला; पण नेते काही आलेच नाहीत. सव्वासहा वाजता नेत्यांचे आगमन झाले, मोजकी भाषणे झाली अन् बैठक संपली. मात्र, प्रचाराचे अवघे सहा दिवस शिल्लक असताना त्यातील तीन तास कोणाच्या प्रतीक्षेत घालवणे नितीन पाटील यांना अवघड होते.


बैठकीस काँग्रेस जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, आमदार एम. एम. शेख, प्रकाश मुगदिया, अरुण मुगदिया, जितेंद्र देहाडे, नगरसेवक प्रमोद राठोड, जीएसए अन्सारी, अँड. सय्यद अक्रम, महिला जिल्हाध्यक्षा विमल मापारी आदी उपस्थित होते.