आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा फुले, मुकटेंच्या मालमत्तेवर लक्ष केंद्रित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- समाज कल्याण विभागातील शिष्यवृत्ती घोटाळ्यातील सहायक आयुक्त मनीषा फुले समाजकल्याण निरीक्षक अंगद मुकटे यांचा तपास चालूच आहे. याशिवाय दोघांच्या मालमत्तेची माहिती संकलन सुरू असल्याचे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले.

मुकटे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. अकलूजच्या सहारा शिक्षण संस्थेच्या नावावर ६५ लाखांची शिष्यवृत्ती जमा झाली. संबंधित संस्थेने मुकटे यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर लाख रुपये धनादेशाद्वारे पाठवले. यामुळे फुले आणि मुकटे यांच्या नावावर कुठे? किती रक्कम आहे? त्यांची मालमत्ता किती? याबाबत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस सांगत आहेत.

‘सहारा’च्या नावाने जमा रकमेची तपासणी केली जाणार आहे. मुकटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. फुले यांचा अद्याप पत्ता नाही. त्यांच्या शोधासाठी येत्या तीन दिवसांत वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना होणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.