आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सवाई गंधर्व’मध्ये गाणार नाशिककर मंजिरी असनारे-केळकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रासह देशभरातील गायक, वादक कलावंत ज्या महाेत्सवात अापली कला सादर करायला मिळणे हा माेठा सन्मान समजतात , त्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महाेत्सव’मध्ये नाशिकच्या मंजिरी असनारे - केळकर यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात अाले अाहे. या सवाई महाेत्सवात गायनाची संधी मिळणाऱ्या त्या पहिल्याच नाशिककर गायिका ठरणार असून, त्यांच्या निमित्ताने नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खाेवला जाणार अाहे.
जयपूर घराण्याच्या शास्त्रीय गायिका मंजिरी असनारे-केळकर नाशिकसाठी एक भूषण आहे. जयपूर घराण्याचा एक अाश्वासक आवाज म्हणून मंजिरी यांचे नाव घेतले जाते. सांगलीचे माहेर असलेल्या मंजिरीताई या लग्नानंतर गत दाेन दशकांहून अधिक काळापासून नाशिककर बनलेल्या अाहेत. त्यांच्या गायनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार सन्मान प्राप्त झाले आहेत. यंदा महाेत्सवाचे ६४ वे वर्ष : शास्त्रीयसंगीताची परंपरा लाभलेला, नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा आणि युवा पिढीलाही शास्त्रीय संगीताची गोडी लावणारा असा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा दि. ते ११ डिसेंबरदरम्यान होणार आहे. महोत्सवाचे यंदा ६४ वे वर्ष आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव रमणबाग प्रशालेच्या मैदानावर दुपारी ते रात्री १० या वेळेत होणार आहे. यंदाच्या महोत्सवामध्ये २१ कलाकार कलाविष्कार सादर करणार अाहेत. त्यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग राहणार आहे. दरवर्षी चार दिवस चालणारा हा महोत्सव यंदा पाच दिवस हाेणार आहे. तसेच, परवानगी मिळाल्यास शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी डिसेंबरचे सत्र दुपारी ते रात्री १२ पर्यंत चालणार अाहे .
मंजिरी या सांगलीचे प्रसिद्ध तबलावादक आनंद असनारे यांच्या कन्या अाहेत. लहानपणापासूनच घरातून कानावर संगीताचे संस्कार हाेत असतानाच वयाच्या सहाव्या वर्षापासून कथकचे शिक्षण घेतले. तर, दहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण सी. टी. म्हैसकर यांच्याकडे घेतले. एम. एस. कानेटकर यांच्याकडे त्या संगीताची ‘तालीम’ घेत आहेत. कानेटकर हे दिवंगत उस्ताद भुर्जीखान साहेब यांचे गंडाबंद शागीर्द आहेत. ४१ व्या सवाई गंधर्व महोत्सवात १९९३ मध्ये त्यांचा सहभाग हाेता. केंद्र सरकारची संगीतासाठीची शिष्यवृत्ती १९९१-९३ मध्ये त्यांना मिळाली. ऑल इंडिया रेडिओच्या त्या ग्रेड मिळवलेल्या शास्त्रीय गायिका आहेत. त्याशिवाय, त्यांना एनसीपीए आणि पु. ल. देशपांडे फाउंडेशनतर्फे कै. केसरबाई केरकर शिष्यवृत्ती मिळाली आहे. संस्कृती प्रतिष्ठानचा २००३ च्या संस्कृती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. १९९५ च्या जयपूर समारोहात भोपाळ येथे गायन, दिल्लीच्या पलुस्कर समारोहात गायन तसेच दुबई, हॉलंड, बेल्जियम, इंग्लंड आदी देशांतील विविध सोहळ्यांमध्ये त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

डिसेंबरला रंगणार गायन
डिसेंबरपासून प्रारंभ हाेणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनईवादनाने होईल. २०१६ हे वर्ष भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे जन्म शताब्दी वर्ष असून, महोत्सवाचा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरला मंजिरी असनारे - केळकर यांचे गायन हाेणार अाहे. त्यामुळे त्यांच्या या सादरीकरणाने नाशिकला प्रथमच सवाईमध्ये कला सादरीकरणाचा मान मिळणार अाहे. त्याशिवाय, अन्य गायक, वादकांच्या कलांचे सादरीकरणदेखील महाेत्सवात हाेणार असून, हा महाेत्सव प्रथमच एेवजी दिवसांचा हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...