आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. सतीश चव्हाणांमुळे पक्षाची स्थिती वाईट - मनमोहनसिंग ओबेरॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो - आ. सतीश चव्हाण)
औरंगाबाद - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आ. सतीश चव्हाण यांच्याभोवतीच असल्यामुळे शहरात पक्षाची परिस्थिती वाईट झाली आहे. आम्ही राष्ट्रवादीला वाढवण्यात खूप कष्ट केले. मात्र, निष्ठावंतांना दूर करून पक्षाला हायजॅक केल्यामुळे पक्ष कमजोर झाला आहे. माध्यमांनीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाची ताकद कमी का झाली आहे, याबाबत प्रश्न विचारायला हवा होता, असे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी म्हटले आहे.

क्रांती चौकातील कार्यालयात बोलताना मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी पक्षातील राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली. पवारांना कार्यकर्ते भेटतील ते पक्षाच्या परिस्थितीबाबत काही सांगतील, या भीतीनेच त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्यास रोखले गेले, असाही आरोप ओबेरॉय यांनी केला. तुम्हाला पक्षाने विधान परिषदेत संधी दिली नाही आता कधी संधी मिळेल, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांिगतले की, जेव्हा सत्ता होती त्यावेळी संधी मिळाली नाही आता काय मिळणार आहे. ओबेरॉय यांनी त्यांच्या मनातील खंत होती त्याला वाचा फोडून पक्षाला घरचा आहेर दिला पक्षाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

आम्ही बारा वर्षे लोक जोडण्याचे काम केले
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शहरात येऊन गेले. त्या वेळी त्यांना कुणालाही भेटू दिले नाही. राष्ट्रवादीला उभारण्यासाठी आम्ही काय काय केले आम्हालाच माहीत आहे. आम्ही लोक जोडण्याचे काम केले, याला दहा-बारा वर्षे लागली. आ. सतीश चव्हाण सर्व निर्णय घेत असल्यामुळे आज पक्षाची स्थिती वाईट झाली आहे.