आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनविसेचा तंत्रशिक्षण विभाग सहसंचालकांना घेराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्या, या मागणीसाठी मनविसेच्या वतीने तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना घेराव घालण्यात आला.
अभियांत्रिकी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाने 29 जुलै डेडलाइन दिली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातून ही प्रमाणपत्रे 29 जुलैपर्यंत मिळणे शक्य नसल्याने मुदतवाढ देण्यावी यावी, या मागणीचे निवेदन तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांना देण्यात आले. हनुमान शिंदे, योगेश कदम, सचिन शिंदे, आकाश खोतकर, शेखर पाटील आदींची उपस्थिती होती.