आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे "व्यंगचित्रांचा अभ्यासक्रम सुरू करण्‍याची मनसेची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभागात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या सन्मानार्थ अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शिवाय नोंदणीकृत प्राध्यापक संघटनांशीच चर्चा करा, बेकायदेशीर संघटनांवर बंदी घालण्याची मागणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे (२८ जानेवारी) करण्यात आली आहे. विद्यापीठांतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संघटनांना आवर घालण्याचीही कुलगुरूंकडे मागणी करण्यात आली.

कॉमन मॅन तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार डॉ. आर. के. लक्ष्मण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता आणि व्यंगचित्र क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक आणि राजकीय विषयांवर अत्यंत बोलक्या रेषा ओढून मार्मिक भाष्य करणारे लक्ष्मण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक-राजकीय व्यंगचित्र अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी मनसेच्या विद्यार्थी संघटनेने केली आहे. शिवाय अनधिकृत प्राध्यापक संघटना विद्यापीठात येऊन गोंधळ घालण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडे नोंदणी असलेल्या प्राध्यापक संघटनांनाच विद्यापीठात प्रवेश देण्यात यावा, अशी विनंतीही कार्यकर्त्यांनी केली आहे. ज्या संघटनांकडे नोंदणी नाही अशा संघटनांवर बंदी घालण्यात यावी, पुढारपण करणाऱ्या प्राध्यापकांचे आठवड्यातील ४० तास अध्यापनाचे होतात का.. याची पडताळणी करावी, प्राध्यापकांना बायोमॅट्रिक्स हजेरी बंधनकारक करा आदी मागण्या दोन निवेदनांद्वारे करण्यात आल्या आहेत. गौतम आमराव, अॅड. दुष्यंतकुमार कल्याणकर, विशाल आमराव, आनंद खरात, आनंद भिसे, राजदीप सोनवणे, सागर जाधव आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.