आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून केरळकडे सरकला, विदर्भात मात्र उष्णतेची लाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने नैऋृत्य मोसमी पावसाची वाटचाल केरळच्या दिशेने होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून दक्षिण केरळ, मालदीव-कामोरिन तसेच अरबी समुद्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

विदर्भात सोमवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये  तापमान ४७ अंशांच्या आसपास आहे. दरम्यान, २६ ते ३० मे या काळात दक्षिण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...