आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून 26 मे राेजी केरळमध्ये; 10 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार, नैऋत्य मान्सूनची आगेकूच सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा नैऋत्य मान्सून  केरळात नियोजित तारखेच्या चार ते पाच दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. केरळात २९ मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज नुकताच भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला अाहे.
 
स्कायमेटनेही असेच भाकीत व्यक्त करत मान्सून २६ ते ३० मेपर्यंत केरळात सक्रिय होईल असे म्हटले आहे. मोसमी वाऱ्याचा सध्याचा वेग, हिंदी महासागरातील हालचाली आणि अरबी समुद्रातील तापमान यावरून मान्सून २६ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता दुणावली असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 
आयएमडीनुसार, बंगालचा उपसागर व लगत चक्रवात असल्याने मान्सूनची वाटचाल २४ तासांत कामोरिनच्या  दक्षिण भागात, बंगालच्या उपसागरात होण्यास अनुकूल स्थिती आहे.  स्कायमेटच्या मते, केरळ आणि कर्नाटकात दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाची हजेरी आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून अार्द्रतायुक्त वारे वाहत असून त्यामुळे या भागात आणखी पाऊस होईल. ही स्थिती आगामी २४ तास कायम राहिली तर केरळात मान्सून २६ मे ते २९ मे या काळात दाखल होईल.

८ ते १० जूनपर्यंत मराठवाडा-विदर्भात अागमन
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील सध्याचे वातावरण पाहता केरळात २६ ते २८ मे रोजी मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, राज्‍यातील कोणत्‍या भागात कधी होणार मान्‍सूनचे आगमन...
बातम्या आणखी आहेत...