आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manufacturing Excellence Conference Issue At Aurangabad

ग्राहकांसोबत घालवा दिवस, सीआयआयच्या "मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स' परिषदेत उद्योजकांचे मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दर्जेदारउत्पादनासाठी व्यवस्थापनातील वरिष्ठांनी ग्राहकांसोबत एक दिवस घालवावा. त्यामुळे ग्राहकांच्या समस्या तसेच त्यांना काय अपेक्षित आहे याची माहिती उत्पादकांना मिळेल, असे मत बजाजचे वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास झांजरी यांनी व्यक्त केले.

सीआयआयतर्फे ताज व्हिवांता हॉटेलमध्ये सहाव्या "मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स' या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सीआयआयचे अध्यक्ष अनिलसिंग मखलोगा, व्हेरॉक ग्रुपच्या टेक्नॉलॉजी अँड स्ट्रॅटेजी विभागाचे अध्यक्ष रवी दामोदरन, सीआयआयचे मराठवाडा अध्यक्ष प्रशांत देशपांडे, माजी अध्यक्ष कुलथू कुमार, कॅनपॅकचे रामचंद्र उणे, एनआरबीचे प्लँट हेड हेमंत जोग यांनी मार्गदर्शन केले. झांजरी म्हणाले, प्रत्येक कंपनीने दर्जेदार उत्पादनासाठी बेंचमार्क ठरवले पाहिजे. त्यामुळे ग्राहकालादेखील समाधान मिळेल. त्यासाठी उत्पादनाचे ब्रँड तयार करण्याची गरज आहे. अ‍ॅपलचा फोन महागडा असतानाही त्याच्या लाँचिंगच्या वेळी ग्राहक रांगा लावून उभे असतात. अ‍ॅपलने ब्रँड व्हॅल्यू वाढवल्यामुळे ते शक्य झाले. गेल्या चार वर्षांपासून आम्ही उत्पादनाची किंमत तीच ठेवून उत्पादनात विविधता आणली. त्यामुळे उत्पादनात विविधतेला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षांत शहरातून मोठी निर्यात
अनिलसिंगमखलोगा म्हणाले, येत्या पाच वर्षांत औरंगाबादमधून निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी आशा आहे. पंतप्रधान मोदींच्या "मेकिंग इंडिया' घोषणेमुळे उत्पादन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डीएमआयसीमुळे रोजगारातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण होईल. सध्या शहरातून ७२ देशांत जवळपास दोन हजार कोटींची उलाढाल होते.

गुणवत्तेसाठी इनोव्हेशन महत्त्वाचे
दामोदरनम्हणाले, उत्पादनात सुधारणेसाठी तंत्रज्ञान, इनोव्हेशन महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुणवत्ता सुधारता येते. सीआयआयचे मराठवाडा अध्यक्ष प्रशांत देशपांडे म्हणाले, आज कुशल मनुष्यबळ मिळत नाही. त्यासाठी अभियांत्रिकी, आयटीआयच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सीआयआयच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीआयआयच्या कार्यक्रमात बोलताना कैलास झांजरी. व्यासपीठावर अनिलसिंग मखलोगा, कुलथू कुमार, रवी दामोदरन, प्रशांत देशपांडे. छाया : माजेद खान