आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GSTN नेटवर्कची आर्थिक लूट, कोट्यवधींची चालान लगेच क्रेडिट होत नसल्याने व्यापाऱ्यांना भुर्दंड!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- करदाते, सल्लागार सीएंना जीएसटी वेबसाइटमध्ये तांत्रिक दोषांमुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरचा पहिले मासिक विवरण ऑनलाइन भरण्याची २५ ऑगस्ट ही शेवटची तारीख. मात्र या तांत्रिक अडचणी सोडवण्याचे जीएसटी नेटवर्कचे प्रयत्न तोकडे पडल्याने शहरातील हजारो व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा आर्थिक भुर्दंड बसला आहे, तर तितकेच व्यापारी उद्योजक पहिलाच कर भरण्यास मुकले. औरंगाबाद येथील सीए रोहन आचलिया यांनी शेवटी थेट पंतप्रधान मोदींनाच तक्रारीचे ट्विट केले. 

करदाते बँकेच्या ई-पेमेंट माध्यमातून करभरणा करत असत. हा कर जीएसटीएनच्या खात्यात जमा होत नव्हता. त्यामुळे विवरणपत्रे भरताना अडचणी येत होत्या. करदाता कर भरत असूनही नेटवर्कवर चालान फेल दाखवले जात होते. हा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्याने व्यापारी उद्योजकांची विवरणपत्रे भरताना अनंत अडचणी आल्या. पाच दिवसांपूर्वी भरलेल्या चालनची रक्कम तत्काळ जमा झाल्याने अनेकांना ती दुसऱ्यांदा भरली. पण हे चालान तब्बल पाच दिवसांनी क्लिअर झाल्याने दुहेरी रकमेचा बोजा व्यापारी, उद्योजकांना पडला. त्याचा प्रचंड मनस्ताप सीए वर्गाला झाला. 

पूर्वीच्या कर कायद्यातून (व्हॅट, सेवा शुल्क, उत्पादन शुल्क) स्थलांतरित झालेल्या व्यापारी उद्योजकांना जीएसटी नोंदणी रद्दबातल करण्याची प्रक्रिया अद्यापही उपलब्ध केली नाही. अशा उर्वरित.पान 

थेट मोदींकडे केली तक्रार 
जीएसटीएनची साइट गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला त्रासदायक ठरत आहे. एकदा तारीख वाढवली तरीही प्रश्न सुटला नाही. गणेश चतुर्थीला आम्हाला दिवसभर कार्यालयात बसून राहावे लागले. या साइटबाबत कोणीच काहीही दखल घेईना म्हणून थेट पंतप्रधान मोदींना ट्विट करून कैफियत मांडली. -रोहनआचलिया, सीए 

जीएसटीएन साइट वारंवार हँग 
जीएसटीएन साइटवर प्रचंड मोठा ताण येईल याची कल्पना असूनही तो ताण हताळण्यास ही प्रणाली पूर्णत: फेल ठरली आहे. ती सातत्याने बंद अथवा हँग होत आहे. रोज रात्री १० ते सकाळी पर्यंत ही साइट देखभालीच्या नावाखाली बंद असते. त्यामुळे त्या काळात तिचा उपयोगच होत नसल्याची तक्रार सीएंची आहे.
- अतुल मोदाणी, सीए 

दुरुस्ती प्रक्रियाच कार्यान्वित नसल्यामुळे अडचण 
नोंदणीप्रक्रियेतील दुरुस्तीची प्रक्रिया अद्याप कार्यान्वित केली नाही. करदात्यांना प्रोफाइलमध्ये मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, नाव, वस्तू सेवेचा एचएसएन कोड यासारख्या युजरफील्ड बदलता आले नाही. यामुळे बऱ्याच करदात्यांना लाॅगइन करता येत नाही. पर्यायाने जीएसटीचा कर रिटर्न भरता आले नाही. 
बातम्या आणखी आहेत...