आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांचा जल्लोष; तर मुस्लिम नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ क्रांती चौकात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

औरंगाबाद - भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने 26 जूनला दुपारी 12 वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करत ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा संघटनांच्या आंदोलनाला खर्‍या अर्थाने यश मिळाले असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर पाटील, संपर्कप्रमुख रमेश केरे, जिल्हाध्यक्ष शिवाजी मार्कंडे, किशोर शिरवत, उद्योजक अमित लिपणे, गीतेश सोनवणे, गंगाधर औताडे, राजेंद्र ठोंबरे, किशन धोत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसीमध्ये समावेश करा : संभाजी ब्रिगेड
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केले, परंतु आरक्षण हे इतर मागास वर्गातून दिलेले नाही. त्यामुळे हे आरक्षण लागू झाल्यास राज्यापुरतेच मर्यादित राहील. केंद्रातील सवलतीचा लाभ मिळणार नाही. तेव्हा मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी लढा सुरूच राहील, असे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, सौरभ खेडेकर, विकास पासलकर, गंगाधर बनबरे, राजेंद्र आढाव, डॉ. संदीप कडलग, सुधीर देशमुख, दत्ता चव्हाण, अभिषेक सरनावत, योगेश डेरे आदींनी सांगितले आहे.
बुलंद छावा :
ढोल-ताशांच्या गजरात टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करत ‘जय भवानी जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला. पेढे वाटून मराठा आरक्षणाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रदेश सचिव सुरेश वाकडे, जिल्हाध्यक्ष मनोज गायके, मराठवाडा अध्यक्ष सतीश वेताळ, महेश चव्हाण, अभिजित काकडे, मंगेश जाधव यांची उपस्थिती होती.
‘एमपीएससी’त आरक्षणाचा फायदा नाही : मेटे
औरंगाबाद । मराठ्यांच्या मुलांना एमपीएससी परीक्षेत काहीच उपयोग होणार नाही. उच्च शिक्षणाच्या संधीत सवलत मिळणार नाही, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. ओबीसीत समावेश केलेला नाही. त्यामुळे आमचा लढा सुरू राहील, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. राज्यात 35 टक्के मराठा समाज आहे. तेव्हा 25 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. राणे समितीने 20 टक्के आरक्षणाची शिफारस केली, मग 16 टक्के आरक्षण दिले कसे, असा प्रश्न आमदार मेटे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. आरक्षण जाहीर करताना चुका झाल्या आहेत. पहिली चूक 16 टक्के आरक्षण जाहीर केले, दुसरी चूक इतर मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला प्रवर्ग न देता वेगळा प्रवर्ग दिला आहे. त्यामुळे हे आरक्षण मराठा समाजाच्या दबावापुढे झुकून देण्यात आले आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाचे आरक्षण जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा.... "5 टक्के नको, किमान 10 टक्के आरक्षण हवे..."