आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाचे नेते क्रांती मोर्चासाठी रवाना, मुंबईचे विमान तिकीट 16 हजारांवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आर्थिक निकषांवर आरक्षण आणि इतर मागण्यांकरिता बुधवारी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा राज्यस्तरीय मोर्चा आहे. त्यासाठी मंगळवारीही औरंगाबादेतून मराठा समाजाचे विविध राजकीय पक्षांचे ४० नेते विमानाने मुंबईला रवाना झाले. २०० जणांनी या प्रवासाची तयारी केली होती. मात्र, कंपनीच्या धोरणात बल्क बुकिंगसाठी सूट नसल्याने १५ जण जेट, तर २५ जण एअर इंडियाच्या विमानाने गेले. जागा कमी आणि मागणी जास्त असल्याने तिकिटाचा दर १६ हजार रुपयांवर पोहोचला होता. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजातील नेत्यांना अख्खे विमान बुक करण्याची इच्छा होती. अंतिम यादीत २०० जणांचे नाव होते. एकगठ्ठा बुकिंग केले तर तिकीट दरात मोठी सूट मिळेल, या अपेक्षेने काही जण 1 ऑगस्ट रोजी एअर इंडिया कार्यालयात गेले. मात्र, कंपनी ऑफर काढते त्याच वेळी ही किंवा दोन-तीन महिने आधी बुकिंग केले तर सूट मिळू शकते, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वाढीव दराची तिकिटे खरेदी करून शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह १५ जण मंगळवारी सायंकाळी जेटच्या विमानाने मुंबईला रवाना झाले. एअर इंडियाच्या ८.५० च्या विमानात २५ जणांची बुकिंग होती. मागणी वाढल्याने एअर इंडियाच्या रात्री ८.५० च्या विमानाचे तिकीट सोमवारी १२ हजार, तर मंगळवारी १६ हजार रुपयांवर गेले होते. 
 
पुढील स्‍लाइडवर...जिल्ह्यातून लाखावर मराठा बांधव मुंबईला 

 
बातम्या आणखी आहेत...