आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणाचे गाजर दाखवणाऱ्या सरकारविरुद्ध मराठ्यांचा एल्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांची दखल न घेणाऱ्या युती सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी बुधवारी झालेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीत एल्गार पुकारण्यात आला. समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवणाऱ्या फडणवीस सरकारचा हातामध्ये गाजर घेऊन या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला.

यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये मोर्चेकऱ्यांबाबत केलेले वक्तव्य खिल्ली उडवणारे असल्याचा आराेप करण्यात आला. समाजाच्या मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यात ५६ मोर्चे काढण्यात आले. पण यापैकी एकही मागणी सरकारने मान्य केलेली नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
भाजपकडून दिशाभूल
या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील व आशिष शेलार दिशाभूल करत असून, हेच नेते आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर समाजाच्या लोकांना मोर्चा काढण्यासाठी या सरकारनेच  प्रवृत्त केले, असाही आरोप करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...