आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो मराठा मुली उतरल्‍या रस्‍त्यावर, पाहा असे केले मूक मोर्चाचे नेतृत्‍त्‍व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी राज्‍यातील विविध शहरांमध्‍ये लाखो मराठा बांधवांचे मोर्चे निघत आहेत. प्रत्‍येक शहरातील मोर्चा हा ऐतिहासीक ठरत असल्‍याचे दिसून येत आहे. विशेष बाब ही की, एवढ्या मोठ्या संख्‍येने मराठा समाज आपल्‍या मागण्‍यांसाठी एकत्र येतो. मात्र अद्यापतरी कोणताही अनुचित प्रकार कुठेही घडला नाही. मोर्चामध्‍ये जमणा-या लाखो लोकांमध्‍ये महिला आणि युवतींचे प्रमाणही विशेष उल्‍लेखनिय आहे. प्रत्‍येक मोर्चात विविध फलक घेऊन मराठा समाजाच्‍या मुली आपल्‍या मागण्‍या मांडण्‍यासाठी समोर येताना दिसताहेत. जालना, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, पुणे, बीड यासह विविध शहरांमध्‍ये झालेल्‍या मोर्चांचे नेतृत्‍व महिला आणि युवतींच केले आहे. कोपर्डी प्रकरणातील मुलीला श्रद्धांजली वाहून मराठा युवती ठिकठिकाणी जिल्‍हाधिका-यांना निवेदन देत आहेत.
स्वयंसेवकांमध्‍येही युवती अग्रेसर..
लाखो समाजबांधवांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रत्‍येक मोर्चात हजारो युवा स्‍वयंसेवकाच्‍या भूमिकेत काम करताना दिसत आहेत. यामध्‍ये मराठा युवतीही मागे नाहीत. गटागटाने स्‍वयंसेवकाच्‍या भूमिकेत सहभागी होऊन मुली शिस्‍त आणि संयमाचे धडे देतात. कुठे कचरा आढळल्‍यास तो उचलून कचरा पेटीत टाकतात. मोर्चात सहभागी झालेल्‍या बालकांना, वृद्धांना कोणत्‍याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेताना दिसतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, राज्‍यात लाखो मराठा मुली उतरल्‍या रस्‍त्यावर..
बातम्या आणखी आहेत...