आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईऐवजी अाता १४ डिसेंबरला नागपुरात निघणार मराठा मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुंबईत मोर्चा काढण्यापूर्वी १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मागण्या मान्य न केल्यास मुंबईत धडक मारू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने रविवारी पत्रकार परिषदेत दिला. मंुबईत मोर्चा काढण्यासाठी औरंगाबाद येथील एमजीएमच्या रूक्मिणी सभागृहात मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीनंतर समितीने भूमिका जाहीर केली. नागपूरमध्ये मागण्यांचा विचार न झाल्यास मुंबईतील मोर्चाची तारीख ठरवली जाणार आहे.

बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातून ११ सदस्यांना निमंत्रित केले होते.या वेळी समाजाच्या ११ प्रमुख मागण्यांचा ठराव घेण्यात आला. १४ तारखेला तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल. नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून निघणारा मोर्चा थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे. या बैठकीत आरक्षण आणि अॅट्रॉसिटीवर अभ्यास करण्यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली अाहे. यात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, माजी न्यायमूर्ती एस. बी. म्हसे, प्रा. सदानंद मोरे, जयसिंग पवार, प्राचार्य एम. एम. तांबे, वसंतराव मोरे, निर्मलकुमार देशमुख, राजेंद्र कोंढरे यांचा समावेश आहे.
लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत : मराठा समाजाच्या मागण्यांच्या समर्थनार्थ समाजातील आमदार, खासदारांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देण्याऐवजी सभागृहांमध्ये आवाज उठवला पाहिजे. अन्यथा समाज त्यांनाही जागा दाखवेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या आहेत प्रमुख मागण्या
कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सहा महिन्यांत आरोपींना फासावर लटकवावे, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कायद्यात बदल करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी ५ हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मराठा समाजातील तरुणांना किमान कौशल्य विकास, उद्याेग व नोकरीसाठी प्रशिक्षण देणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी, २०१७ पूर्वी अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारावे, १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्यात यावी.
नागपुरात निघणार दोन मोर्चे
नागपुरात दोन मोर्चे काढण्याचे नियोजन होत आहे. विदर्भात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यवतमाळ येथे सकल मराठा-कुणबी समाज बॅनरखाली मोर्चा निघाला हाेता. तसाच माेर्चा नागपुरातही निघावा, अशी एका गटाची इच्छा अाहे. मात्र राज्यातील सर्वच मोर्चांची ‘सकल मराठा’ अशी निर्माण केलेली अाेळख कायम राहावी, असा काहींचा अाग्रह अाहे. दुसरीकडे मराठा विद्या प्रसारक मंडळातील एका गटाने सकल मराठा- कुणबी मोर्चासाठी आग्रह धरला अाहे. त्यामुळे २५ अाॅक्टाेबर राेजी नागपूर विभागाचा सकल मराठा समाजाचा माेर्चा काढण्यात येईल, तर दुसरा मोर्चा १४ डिसेंबर रोजी काढण्याचे नियाेजन हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...