आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा मूकमोर्चात आता ‘हुंडा मुक्ती’चा एल्गार! हुंडा देणार नाही, घेणार नाही अशी घेणार शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आरक्षण आणि अॅट्राॅसिटी कायद्यातील दुरुस्तीसाठी एकवटलेला मराठा समाज आता ‘हुंडा मुक्ती’च्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे वळला आहे. आम्ही मुलीला हुंडा देणार नाही आणि भावी सुनेकडून हुंडा घेणार नाही, अशा घोषणांचे फलक यापुढील मोर्चांमध्ये झळकणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या तरुणीच तशी शपथ घेणार आहेत. ऑक्टोबरला औरंगाबादेत राज्यस्तरीय मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. त्यात संयोजकांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मुलींच्या लग्नासाठी हुंडा हा एक मोठा मुद्दा असल्याचे वेळोवेळी चर्चेत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुसंख्य मराठा समाजाने ‘हुंडा मुक्ती’चे पाऊल उचलले तर हे अन्य समाजांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे.
औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची बैठक झाली. मुंबईपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर मोजक्या संयोजकांची विशेष बैठक झाली. यापुढील मोर्चादरम्यान ‘हुंडा मुक्ती’वरही लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवण्यात आले. आरक्षण, अॅट्रासिटी कायद्यातील दुरुस्ती इतकाच हुंडा बंदीचा मुद्दा महत्वाचा असल्याच्या मुद्यावर एकमत झाले.

अनेक शेतकरी मुलीचे लग्न ठरल्यावर खिशात पैसे नसेल जमिन विकून हुंड्याची रक्कम उभी करतात. हातची जमिन तर जातेच शिवाय आर्थिक संकटाचे दुष्टचक्रही ओढवते. हुंडा बंदी झाली तर शेत विक्री, आत्महत्याही थांबतील, असा मुद्दा एका संयोजकांनी मांडला. अलीकडील काळात मराठा समाजाच्या शेतकऱ्याची जमिन अन्य समाजाचे लोक घेत आहेत. त्यामुळे आपोआपच मराठ्यांच्या जमिनी कमी होत आहेत. हुंड्याची पद्धतच बंद झाली तर आपोआपच जमिनीचे संरक्षण होईल, असे निरीक्षण दुसऱ्या संयोजकाने नोंदवले. आरक्षणाचे कवच असलेले समाज हुंडा घेणे, देणे टाळत आहेत. लग्नाचा खर्च वधू-वर पक्षाकडून मिळून केला जात आहे. मग आपलाच समाज त्यात मागे का, असाही त्यांचा सवाल होता. त्यास जोरदार पाठिंबा मिळाला. आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्याप्रमाणेच हुंडाविरोधात घराघरापर्यंत जात जागृती करण्याचे ठरले.

पुढील मोर्चात प्रचार
आतानागपूर अधिवेशन तसेच तालुकास्तरावर मोर्चे निघणार आहेत. त्यात मराठा समाजातील कोणीही हुंडा मागणार नाही हुंडा घेणार नाही, अशी जागृती केली जाणार आहे. नेतृत्व करणाऱ्या तरुणी तशी शपथ देतील.
बातम्या आणखी आहेत...