आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा साहित्य संमेलन चंद्रपुरात ; अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारा आयोजित 9 वे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन चंद्रपूर येथे 26, 27 व 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. महात्मा जोतिबा फुले साहित्य परिसर, चांदा क्लब ग्राउंड येथे होणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत साहित्य परिषदेचे प्रदेश सचिव प्रा. दिलीप चौधरी यांनी दिली.
यंदा चंद्रपूर शहराच्या स्थापनेला 500 वर्षे पूर्ण होत असल्याने हे संमेलन तेथे घेण्यात येत आहे. मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर नेताजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदी बाबा भांड यांची निवड करण्यात आली. तीन दिवस चालणार्‍या या साहित्य मेळाव्यात सहा परिसंवाद, प्रकट मुलाखती, साहित्य दिंडी, लोककला सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी राहणार आहे. पत्रकार परिषदेस प्रदीप साळुंके, विजय गवळी, अरुण कोकाटे, दिनकर गायकवाड यांची उपस्थिती होती.