आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ अखेर सतीश चव्हाणांकडेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या १० जुलै २०१३ रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यकारिणीस मुंबई धर्मादाय आयुक्तांनी हिरवी झेंडी दाखवत आ. सतीश चव्हाणांच्या बदल अर्जास मंजुरी दिली आहे. सभेत १७९ पैकी १०२ सभासदांनी अध्यक्षपदी प्रकाश सोळंके, सचिवपदी आ. सतीश चव्हाण तर उपाध्यक्षपदी शेख अहेमद शेख चाँद , मानसिंग पवार यांची बिनविरोध निवड केली आहे.

निवडणुकीनंतरचा बदल अर्ज धर्मादाय उपायुक्त औरंगाबाद यांनी फेटाळला होता. याविरोधात मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. आयुक्तांनी औरंगाबाद धर्मादाय उपायुक्तांचा निर्णय खारीज करत नवीन कार्यकारिणीची निवड वैध ठरवली आहे. यामुळे नवीन कार्यकारिणीचा पूर्णपणे कामकाज पाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मशिप्र मंडळाची मराठवाड्यात २३ महाविद्यालये, १०४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत.