आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभारवाड्यात बाइककवरून जाताना मजा आली, दिलीप प्रभावळकरांनी अनुभवले औरंगाबाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुंबई-पुण्याच्याबाहेर गेलेली मराठी सिनेमांची कथानके पाहून वीट आलेल्यांना आता औरंगाबादी तडका असलेली लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रीकरणाच्या निमित्ताने औरंगाबादी संस्कृती जवळून पाहायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला, तर कुंभारवाड्यातून दुचाकीवरून जाण्याचा अनुभव वेगळाच होता, असे सांगितले.

मूळ औरंगाबादकर असलेल्या ऋतुराज धालगडे दिग्दर्शित 'स्लॅमबुक' हा मराठी चित्रपट २१ आॅगस्टला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त धालगडे, प्रभावळकर, नायिका रितिका श्रोत्री यांनी दिव्य मराठी कार्यालयाला भेट दिली. या वेळी संवाद साधताना दिलीप प्रभावळकर यांनी औरंगाबादमध्ये नाटकांच्या प्रयोगासाठी खूप वेळा आलो; पण शूटिंगसाठी प्रथमच आलो होतो, असे सांगत तो अनुभव चांगला असल्याचे म्हटले. सिनेमाची कथाच औरंगाबादेत घडत असल्याने येथेच श्ूटिंग करण्यात आले. बीबी का मकबरा, वाल्मी, विद्यापीठ येथे तर शूटिंग झालेच; पण कुंभारवाड्यातून गुलमंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीवरून जाण्याचाही एक सीन शूट करण्यात आला.

प्रेमात पडलेल्या नातवाला मार्गदर्शन करणारा, प्रेमाचे पैलू उलगडून दाखवत त्याला मदत करणारा असा आजोबा इथे करायला मिळाला. दिग्दर्शक ऋतुराज धालगडे म्हणाले की, अपर्णा ह्रदय या दोघांची ही प्रेमकथा आहे. शंतनू रांगणेकर नायक तर रितिका श्रोत्री नायिका आहे. अपर्णा पुण्याहून मामाकडे औरंगाबादला येते आणि काॅलनीतील हृदय हा तरुण तिच्या प्रेमात पडतो. त्याचे आजोबा त्याला या नाजूक वयातील प्रेमात मदत, मार्गदर्शन करतात. असा हा हलकाफुलका रोमँटिक विषय आहे. या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, माधवी सोमण, कुशल बद्रिके, सुप्रिया पाठारे, अभिजित चव्हाण, योगेश शिरसाट, श्रुती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकांना न सांगता शूटिंग
मलाडबल सीट घेऊन जाणाऱ्या कलावंताला मी "जपून घेऊन जाशील ना रे गर्दीतून?' असे विचारले होते. आम्ही ते शूट लोकांना न सांगता केले होते. मी स्थानिकच दाखवलेला असल्याने जाताना लोकांना हात दाखवत होतो. लोकांच्या प्रतिक्रिया पाहताना मोठी मजा आली.